माय मराठी
माय मराठी
1 min
261
ग्रंथात शोभणारी
काव्यात असणारी
अभंगात वसलेली
ओवीत असलेली
श्रृंगाराने नटलेली
वीराने फुगलेली
करूणेने ओलसर
भयरसात भ्यालेली
अमृतासोबत
पैज लावली
जिंकुनीया
श्रेष्ठ जाहली
साधेपणाचं
लेणं ल्यावून
माय मराठी
माय झाली
