माता जिजाऊ
माता जिजाऊ


मनी करुनी कुलस्वामीचे चिंतन अंगाई ती गाई,
शिवरायांची जिजाऊ माता पुण्यशील ती आई।।
दिले शिक्षण शिवबांना झाली आदर्श माता ती,
बनविले लढण्या धैर्यवान झाली वीर माता ती,
करण्या बळकट, स्वराज्य चौकट, केली ना कसुराई।।
जिजाऊच्या ध्येया-पोटी बाळराजा घडला हा,
स्वराज्य निर्मिती करण्या रणांगणी झुंजला हा,
असंख्य सैन्यासह झुंजण्या लाभली आऊंची पुण्याई।।
जाती-पातींना एकवटूनी घडविला हा स्वराज्य,
सैन्य रचनेत अष्टप्रधानी सामाविला सामराज्य,
गाठण्यास स्वप्न जिजाऊंचे पावन झाली ती शिवाई।।
साम्राजातील सर्व अबलांना मानिल्या मातेसमान,
येता संकट रयतेवरती मारिले कित्येक ते सैतान,
म्हणून झाला आदर्श राजा हीच स्वराज्य नवलाई।।४।।