मार्ग सरळ आहे
मार्ग सरळ आहे
1 min
235
मार्ग सरळ आहे, आहेत अनेक पळवाटा
सरळ चालणाऱ्या जीवाचा होतो आटापिटा
क्षणभंगुर सुखाने तर सुखी आहेत खूप
क्षणिक आणंद मिळवूनी येतो हुरूप
सुख हे मृगजळापरी, हुरळून जाऊ नको
लगेच तुटेल क्षणात असे स्वप्न पाहू नको
विचार कर भविष्याचा, पुढचे ते चित्र जाण
वेळ निघून गेली असेल जेव्हा येईल भान
भानावर येऊन पण तूझ्या हाती नसणार काही
जसा सुटलेला बाण कधी परत येत नाही
पळवाटा सोप्या जरी, ती एक भूरळ आहे
चालत रहा जिद्दीने असाच, मार्ग सरळ आहे
