मानव
मानव

1 min

210
शांत जरी मी, आत कोठेतरी अंगार आहे
झाकलेली वेदना, अंतरात्मा जाळत आहे ---
असेन सामान्य, पण शेवटी मनुष्य आहे
भावनांचा ह्या, सन्मान करीत जगत आहे ---
तो निराळा, मी निराळा तरी भाऊबंद आहे
थोडे आधिक, थोडे उणे हे सर्वमान्य आहे ---
वेदनांच्या भावनांचा, उद्रेक होणार आहे
माणूस आहे, माणसासम वागणार आहे ---
असेन कदाचित, चित्रपटातील मोहरा
मागच्या गर्दितही, हि कला दिसणार आहे ---
म्हणतात असे कि जळी, स्थळी ईश्वर आहे
सर्वत्र जाणवणारा, फक्त हा मानव आहे ---
त्याच्या उत्स्फूर्त भावना, वेदना अन कल्पना
ह्या जगाला असे सतत पुढे नेणार आहे ---