मानव vs कोरोना
मानव vs कोरोना


घरी बसणं झालय अवघड,
बाहेर गेलो तर कोरोना च दडपण..
मास्क घातल्यावर होतं गुदमरायला,
हात धून धून जंतू लागले अंघोळ करायला..
रद्द झाल्या आहेत परीक्षा,
घरी बसूनच लागा कमला..
ऑनलाइन झाल्या सुरु शाळा,
विद्यार्थ्यांना येणार नाही कंटाळा..
शिकलो आपण घरातली कामं करायला,
जुन्या गंमतींवर लागलो हसायला..
घरीच बसून केले देवाचे दर्शन,
भरावं लागेल आता गुणांचे प्रदर्शन..
लावले दिवे, लावले मेणबत्त्या
वाजवल्या टाळ्या, आदळल्या थाळ्या
मागणार नाही कोणी अजून सुट्टी,
कसली सहल आणि कसली पार्टी..
सगळं जग आहे चीन च्या विरुद्ध,
पुन्हा होईल हे विश्व समृद्ध..
कौतुकास्पद आहे डॉक्टर्स-पोलिसांचे कष्ट,
लवकरच होईल हि महामारी नष्ट..
तोवर राखलाच पाहिजे थोडा संयम,
आणि पाळलेच पाहिजे सगळे नियम..
धन्यवाद म्हणतो आम्ही त्यांना,
ज्यांनी ठेवलं सुरक्षित आमहाला..