STORYMIRROR

गोपाळ सुर्यवंशी-(पालघर)

Others

4  

गोपाळ सुर्यवंशी-(पालघर)

Others

माणुसकीची चव

माणुसकीची चव

1 min
26.1K


आता माणूस पूर्वी सारखा रसाळ राहिला नाही....

भावनांनी शुष्क झालाय मधाळ राहिला नाही.....

वासना त्याची झाली आंबट,

आता प्रेमळ राहिला नाही.....

प्रेम ही झाले शुगरफ्री आता,

मनात गोडवा उरला नाही......

माणसे पूर्वी वर्षाला भेटतं,

नव्हता मायेचा झरा आटतं.....

गोधडीची ती ऊब आता,

मलमालित सापडत नाही....

तिखट झालाय राग त्याचा,

त्यात त्याग उरला नाही.....

भकास झालीयं माणुसकी,

माणूस उत्साही उरला नाही.....

भावनांची त्यानें फुलें केली,

जन्माच्या अन मयताच्या वेळी....

इमोजीची संगत करून आता,

ऑफलाईन गाठभेटही घडत नाही.....


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from गोपाळ सुर्यवंशी-(पालघर)