माणसांच जीणं
माणसांच जीणं
1 min
489
हे बाबा जपुनी तु वाग जगात
अरे ईथ लोक नाही रे सुतात !!धृ!!
गोड गोड बोलून मारतील गप्पा
काळजाच्या तुझ्या चोरतील कप्पा
हे बाबा सावधानी असू दे अंगात !!१!!
वंशवेली साठी निष्पाप मारती
सख्ख्या बापाचा सातबारा चोरती
बापाले वृध्दाश्रमी दान देतात !!२!!
माझं माझं म्हणून कुठवर नेशील
सार ईथं ठेवून आरामात जाशील
मोजू नको नाते बाबा तु पैशात !!३!!
