||माणसाचं जगणं||
||माणसाचं जगणं||


मरण झालं सोप इथं कठीण झालंय जगणं
मरण झालं सोप इथं कठीण झालंय जगणं
माणूस कधी शिकेल देवा माणसासारखं वागणं||
देशात मेला राज्यात मेला बाजुवाला मरतोय
देशात मेला राज्यात मेला बाजुवाला मरतोय
तरी बी हा कारण शोधून घराबाहेर पडतोय||
पोलिसाला काय आवडतंय व्हय तुला असं मारणं
माणूस कधी शिकेल देवा माणसासारखं वागणं||
कित्येक जण मरून गेले या कोरोना पायी
कित्येक जण मरून गेलं या कोरोना पायी
रजा समजून मजा मारतोय याला समजत का नाही||
अर्र डॉक्टर सिस्टरला बी अवघड
झालंय घरच्यांना बघणं
माणूस कधी शिकल देवा माणसासारख वागणं||
हा सांगतोय तो सांगतोय बाबा घरात थांब
हा सांगतोय तो सांगतोय बाबा घरात थांब
लागण लागली तुला तर जाशील एवढा लांब
घरच्यांना बी मुश्किल होईल तुला शेवटचं बघणं
माणूस कधी शिकेल देवा माणसासारखं वागणं||
हात धुणं मास्क लावणं शिवाशिव टाळणं
हात धुणं मास्क लावणं शिवाशिव टाळणं
शिकून घे लेका सध्या एवढं नियम पाळणं
तुझ्यामुळे नको ना करू दुसऱ्याचे मुश्किल जगणं
माणूस कधी शिकेल देवा माणसासारखं वागणं||