माझ्या गावाकडची
माझ्या गावाकडची
1 min
11.7K
माझ्या गावाकडची माती
जणू सोन्याची ती खाण
उगवे तिच्या कुशीत
धन-धान्याची ती रास
माझ्या गावाकडची झाडं
म्हणजे आनंदाचं उधाण
बहरती ती बारामास
दरवळे चहूकडे सुगंध
माझ्या गावाकडची नदी
म्हणजे हर्षाचा तो झरा
बारमाही वाहे ती
येई उधाण आनंदाला
माझ्या गावाकडची लोकं
जणू माणुसकीच घर
आम्ही परतल्यावर गावाकडे
त्यांच्यात संचारे आनंद