माझं मी पण
माझं मी पण
1 min
11.7K
मी ही ठरवलं
आता मनासारखं जगायचं
दुसऱ्यांसाठी खूप झालं
आता स्वत:साठी जगायचं.
आपल्याला वेळ असतो
सगळ्यांसाठी सगळं करायला
दुसरे मोकळे असतात
मला वेळ नाही म्हणायला.
सगळ्यांना सगळं काही
हातात देताना
आपसूकच सगळी कामे
आपलीच बनून जातात.
घरात सगळ्यांनाच येतो कंटाळा
आपण मात्र रिचार्ज सदा
सर्वांनाच असते रविवारी सुट्टी
आपण मात्र त्यात मोडतच नाही.
कधी वाटतं आपणच चूकतो
आपणच त्यांना परावलंबी बनवतो
आईची माया, बायकोचं प्रेम
कधीतरी दाखवावं स्वत:वरही सेम!
