Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sonali khopade

Others

3  

Sonali khopade

Others

जीवन

जीवन

1 min
11.9K


जीवन असंच असतं जगायचं;

सागराच्या‌ लाटांसारखं

सतत असतं वहायचं!


जीवन असंच असतं जगायचं;

फुलपाखराप्रमाणं

स्वछंदी उडायचं!


जीवन असंच असतं जगायचं;

कधी रथाच्या चाकाप्रमाणं

समांतरही चालायचं!


जीवन असंच असतं जगायचं;

कानात वारं शिरल्यासारखं

वाट दिसेल तिकडं धावायचं!


जीवन असंच असतं जगायचं;

कधी आकाशातल्या ताऱ्यासारखं

दूरूनचं जग पाहायचं!


जीवन असंच असतं‌ जगायचं;

पावसामधे भिजता भिजता

आसवांना मोकळं आभाळ करून द्यायचं असतं!


Rate this content
Log in