STORYMIRROR

Sonali khopade

Others

3  

Sonali khopade

Others

माझी माय मराठी

माझी माय मराठी

1 min
11.6K

महाराष्ट्राची शान 

सौंदर्याची खाण

माझी माय मराठी.


स्वराज्याचा स्विकार

शिवबाचा जयजयकार

माझी माय मराठी.


देवतांचा वास

वारीचा ध्यास

माझी माय मराठी.


ग्रंथांचा सागर

साहित्याचा आगर 

माझी माय मराठी.


लावणीचा ठेका

बजरंगी हेका

माझी माय मराठी.


निसर्गाशी मेळ

संस्कृतींचा खेळ 

माझी माय मराठी.


भाषेचे संमोहन

भूतली नंदनवन

माझी माय मराठी


Rate this content
Log in