माझी कविता माझी ओळख
माझी कविता माझी ओळख
1 min
112
माझी कविता माझी ओळख
असे मी अभिमानाने सांगते
शब्दांचे मोती करून मी
कवितेची माळ मी ओवते
लय बद्ध, ताल बद्ध तिला
मी नेहमी बनवत असते
माझी कवितेतील विचार ऐकून
माझी ती ओळख सांगते
लेखणीला देवून धार
शब्द पानावर भरभर
अक्षर ही मोत्यासमान
पाहताच क्षणी नयनभर
लिहिते मी ती देते
मला नेहमीच आधार
ओळखही माझी तीच
किती तिचे मानू आभार