STORYMIRROR

Ashok Wable

Others

4  

Ashok Wable

Others

माझी खान्देशी आई

माझी खान्देशी आई

1 min
27.8K


माझी खान्देशी आई नेसते नऊवारी लुगडे

नाही पडते तिचे कधी पाऊल वाकडे

माझ्या खान्देशी आईच्या पायात जोडवा

तिची अहिराणी भाषा जसा ऊसाचा गोडवा||१||


जोडव्याचा पाय हळू टाकते माझी आई

दारी बसले ग दीर,माडीवर सासुबाई

खान्देशी आईचे गोट-पाटल्या अन कल्डा

राम-प्रहरी टाकते अंगणात शेणसडा||२||


माझी खान्देशी आई जात्यावर दळते जोंधळ्याचा दाणा

धनी गेलेत शेतात जीव घरात लागेना

माझी खान्देशी आई, जशी वाटी खोबऱ्याची

भरल्या घरात नांदते, बहिण शोभते दिराणीची||३||


मोटे चालते पाणी वाहे थाळ्यात

खेळ-खेळत तीच तान्ह पाळण्यात

आई मला म्हणते धन्याचं आऊत

तुझ्या बापा सारखा कुणीबी नाहीरे गावात ||४||


आई सांगते लेकीला,नांदून काढ नाव

सग्या-सोयऱ्यात तुझ्या बापाचं मोठं नाव

आब्यांच्या कहीरी आंब्याला घाली बारा

आई तुझ्या साठी गावं कावरा-बावरा||५||


येता देवाचा बोलवा,सोडला का पसारा

तुझ्या विना आई सुना लागे गाव सारा

आई तुझ्यासाठी केली सोन्याची पालखी

तुझ्या विना कोठे दिसेना आलोखी ||६||


Rate this content
Log in