STORYMIRROR

Sonali Palekar

Inspirational

3  

Sonali Palekar

Inspirational

माझे आईबाबा

माझे आईबाबा

1 min
414


एका खोप्यामध्ये दोन पक्षी आले 

चार दिशांना उजळणारे घरटे तयार झाले

छोट्या खोप्यात चारचौघं खेळलो होतो आम्ही

एकोप्याने चौघेही राह्यलो होतो आम्ही.

आमच्यात नव्हती चढाओढ,

आमच्यात नव्हता संघर्ष.

थोडीशी वादावादी, थोडीशी कट्टी.

चुटकीसरशी लगेच होई बुट्टी.


प्रायव्हसी, प्रायोरिटी आईला नव्हते माहित.

कर्तव्याची परिपूर्ती होती फक्त ती जाणीत.

बाबांनाही अजून काय हवे होते,

तिच्या ओठावरचं हसु त्यांचे फलित होते. 

आमचीच स्वप्ने बाबांच्या नयनी होते. 

त्यांना पूर्ण करण्याचे आईच्या मनी होते. 

किती सारे त्यांनी आमच्यासाठी केले,

आयुष्याचे किती तप आम्हासाठी गेले! 


हुशारीचे देणं, लाव्वण्याचे लेणं ताई माझी.

सौंदर्याची जाण, कलात्मकतेचे वरदान मन्टी माझी.

दादामध्ये माझ्या सर्व गुण आहे,

अष्टपैलू व्यक्तित्वाचा तो आरसा आहे. 

चौघे आहो आम्ही चार वेगळ्या दिशा.

गुण आहे जरी वेगळे, एक आहे आशा.

आईबाबांचे स्वप्न व्हावे फलद्रुप,

ते पाहून आम्ही आमचे हरपावे रूप.


धरती आकाश आहे दूरदूर.

भेटतात ना ते क्षितिजावर. 

आम्ही भावंडं जरी असलो दूरदूर,

अधिराज्य करतो तुमच्या ह्रदयावर


आईबाबा तुमच्यासाठी आम्ही काय करावे? 

खूप सुखी केलं आम्हाला, तुम्हाला आम्ही काय द्यावे? 

जे केलं ते कमीच होईल तुमच्यासाठी,

उणं काही नाही ठेवलं तुम्ही आमच्यासाठी. 

म्हणूनच, 

आमच्यात जे तुम्ही पाहिले, ते आम्ही व्हावे 

ग्रीष्मऋतुतही वर्षा होऊन बरसावे.

तुम्ही दिलेल्या संस्काराला सदैव जपावे.

जन्मोजन्मी आम्ही तुमच्या ऋणातच रहावे. 


का कोणास ठाऊक आज, आईबाबा इतके का आठवावे? 

कंठ यावा दाटून, नयनी पाणी यावे?

आईबाबा जवळ राहण्या, कधी न मोठे व्हावे.

जन्मोजन्मी आईबाबा तुम्ही आमचे व्हावे. 


आईबाबा खूप खूप धन्यवाद.


Rate this content
Log in

More marathi poem from Sonali Palekar