STORYMIRROR

A B C D Dil Se

Others

3  

A B C D Dil Se

Others

माझा भारत महान..!

माझा भारत महान..!

1 min
11.6K


    

अनमोल या विश्वात,

माझा भारत महान..!

देशासाठी कित्येकांनी,

दिले प्राणाचं बलिदान..!!


अनमोल या विश्वात,

छत्रपति शिवबांचं शौर्य..!

सीमेवर उभारलेल्या,

सैनिकांचं कार्य...!!


अनमोल या विश्वात,

मार्ग बुद्धांच्या शांतीचा..!

प्रभाव आहे जोतिबांच्या,

शिक्षणाच्या क्रांतीचा..!!


अनमोल या विश्वात,

भारताचं संविधान..!

जगाच्या कल्याणासाठी,

विवेकानंदांचं ज्ञान..!!


अनमोल या विश्वात,

शेतकऱ्याची माती..!

जगाच्या अर्थव्यवस्थेला,

जणु ख़त पाणी देती..!


अनमोल या विश्वात,

बाबासाहेबांची समता..!

देशसेवा केल्यास लाभे,

भारतमातेची ममता..!!


अनमोल या विश्वात,

आपले अब्दुल कलाम..!

त्यांच्या अमूल्य कार्याला ,

 त्यांना करतेय जग सलाम..!!


Rate this content
Log in