लहान भाऊ अन मी
लहान भाऊ अन मी
1 min
26
तु आलास आणि मोठी असल्याची जाणीव झाली
तु आलास आणि तुला सांभाळायची जाणीव झाली
तु आलास आणि टॉम अँड जेरी टीव्ही मधुन बाहेर आले
तु आलास आणि भांडण्यातली मज्जा कळली
तु आलास आणि चोकोलेट्स चोरून देण्यातला आनंद कळला
तु आलास आणि वाटण्यात काय मज्जा असते ती कळली
तु आलास आणि मी माझे बालपण पुन्हा जगले
तु आलास आणि संपूर्ण घर खुदकन हसले
तु आलास आणि आपले घरटे पूर्ण झाले
तु आलास आणि माझ्या राखी ला महत्व आले
