STORYMIRROR

Ravi Patil

Others

3  

Ravi Patil

Others

लढा

लढा

1 min
26.1K


सीमालढा हा सीमालढा

कोणी निर्मिला हा कोंडवाडा

अखंड महाराष्ट्राचा लढा

भिजत पडला का तिढा ?


बेळगांव ते बे- लगाम लढे

हृदयी स्पंदने फडफडे

काळादिन काळीज धडधडे 

सीमाप्रश्नासाठी कोण लढे ?


जरी गाठली एकसष्टी,

तरी जाणार नाही तडे

भगव्याच्या रक्षणेसाठी

मावळ्याला बेडी का पडे ?


भगवी माती , भगवे मन

भगवे वादळ चहूकडे

माय मराठी झेंडा

का कोणाला वावडे ?


पहा वळूनी स्वराज्याकडे

सह्याद्रीचे उंचकडे

तसेच मराठे ध्येयवेडे

का कर नाटकी रडे ?


गोऱ्यांच्याही पलीकडे

अमानुष अत्याचार सोसले

साराबंदी ते महामेळाव्याने

का झोप तुमची उडे ?


मराठ्यांच्या क्रांतीची ढाल

शमशेर दाखवी धडधडा

लढा आमुचा लढा

राडा आमुचा रडा


शिवसैनिक रक्त सांडे.

स्मरुणी हुतात्म्यांचे सडे

बोल मराठी चोहीकडे

प्रश्न सुप्रिम का आडे ?


उगाच नाही हा राडा

वज्रमुठीचा हा हातोडा

आडव्यांचा फोडील थोबडा

मराठीसाठी गा लढा... !

अस्मितेचा गा लढा... ! !

संस्कृतीसाठी गा लढा ... ! ! !

      


Rate this content
Log in

More marathi poem from Ravi Patil