कवितेत या माझ्या
कवितेत या माझ्या
1 min
5.5K
कवितेत या माझ्या, माझ्या मुक्या भावनांनो..
सांत्वनास माझ्या, माझ्या थिट्या आसवांनो..
तुडवती दैवता ज्या, पायदळी माणसा त्या..
गोंजरून करण्यास, उभे पुन्हा बाहुल्यांनो..
नका मानू पसरला, प्रकाश सर्वत्र आहे..
या दाखवितो तुम्हा, अंधार काजव्यांनो..
उन्हात आठवांच्या, उगाच जीव जातो..
घेऊन गारवा या, भर दुपारी सावल्यांनो..
