कविता - 'नयभाषा'
कविता - 'नयभाषा'
1 min
27.6K
नयनभाषा
अल्पसे शब्द अन्
दोन डोळेच बोलके...
प्रेमात नयनभाषा
गुपीत हृदयाचे खोलते...¶धृ¶
नि:शब्द होऊन सारे
मन शब्दापल्याडचे बोलते...
बांधलेल्या भावनांना
मन अपसुकच सोलते...
प्रेमात नयनभाषा
गुपीत हृदयाचे खोलते...¶१¶
नयनांचे गहिरे वारे
हृदय आपुलकीने झेलते...
आस भेटीची लागलेली
मन विरहातही पेलते...
प्रेमात नयनभाषा
गुपीत हृदयाचे खोलते...¶२¶
प्रेमिकांनाच कळते
गर्दीत नयनभाषेचे मोल ते...
लग्नानंतर तीसुध्दा
डोळे वटारूनच बोलते...
प्रेमात नयनभाषा
गुपीत हृदयाचे खोलते...¶३¶
✍कवी प्रमोद जगताप
रा.गोखळी ता.फलटण
जि.सातारा(महाराष्ट्र)
पिन 415523
9561222177
