कवीकट्टा २०१८
कवीकट्टा २०१८
1 min
26.7K
बाव-या भिंती जरी का, बावरी माती नसावी
बाव-या भिंती मध्ये पण, बावरी नाती नसावी
सरळ सोप्या आयुष्याला, बंध आहे आपल्यांचे
सरळ सोप्या बंधनांना, कापती पाती नसावी
आपलेची दात ओठी, दाबण्याचे दुःख भारी
रक्तपाती आशयाला, खूनशी भाती नसावी
दिवस जातो आवराया, छान छौकी अन् पसारा
रात जेथे शांततेची, वाजती छाती नसावी
धावताना जग रहाटी, थांबण्या कारण असावे
घर घरोबा माणसाचा, गैर ती खाती नसावी
