STORYMIRROR

Tejaswita Khidake

Others

4  

Tejaswita Khidake

Others

कुणाला काम करायचंय का काम

कुणाला काम करायचंय का काम

1 min
291

इथं ज्याला त्याला पुढारी व्हायचंय, 

निवडणुक लढवायची आहे आणि 

सत्ता उपभोगायची आहे


कुणाला काम करायचंय का काम ?


इथं ज्याला त्याला नगरसेवक व्हायचंय,

मिरवणुक काढायची आहे आणि 

फुशारकी मारायची आहे 

 

कुणाला काम करायचंय का काम ?


इथं ज्याला त्याला नगराध्यक्ष व्हायचंय,

फसवणुक करायची आहे आणि 

जनतेला लुबाडायचे आहे 


कुणाला काम करायचंय का काम ?


इथं ज्याला त्याला आमदार व्हायचंय,

निधी पास करून घ्यायचा आहे आणि 

डोंगर च्या डोंगर विकत घ्यायची आहे


कुणाला काम करायचंय का काम ?


इथं ज्याला त्याला खासदार व्हायचं आहे

संस्था काढायच्या आहेत आणि 

आपले खिसे भरायचे आहे 


कुणाला काम करायचंय का काम ?


इथं ज्याला त्याला पुढारी व्हायचंय, 

निवडणुक लढवायची आहे आणि 

सत्ता उपभोगायची आहे


कुणाला काम करायचंय का काम ?


Rate this content
Log in