कर्तव्याची जाण
कर्तव्याची जाण
सैनिक लढतो आहे,
तळहाती घेऊन प्राण,
मनी सदैव वसे त्याच्या,
कर्तव्याची जाण.
उभा सदैव सीमेवर,
घेऊन बंदूक हाती,
शत्रूपासून रक्षण करण्या,
मातृभूमीची पवित्र माती.
ऊन, वारा, पावसाची,
नाही करत पर्वा,
जीव धोक्यात घालून,
सुखात ठेवतात सर्वा.
सीमेवर तैनात,
राहतात रात्रंदिनी,
देशसेवा करणे,
हेच त्यांच्या मनी.
युद्धाच्या वेळी,
वाहतात रक्ताचे पूर ,
धैर्याने लढतात सैनिक,
घरापासून राहून दूर.
देशसेवा करणे,
हेच ब्रीद त्यांचे,
भारतीय जनतेवर,
उपकार आहेत सैनिकांचे.
देशभक्तीसाठी करतात,
त्याग सर्व सूखांचा,
कर्तव्यदक्ष सैनिकांमुळेच,
लोप होतो सर्व दुःखाचा.
देशासाठी सहन करतात,
हालअपेष्टा खुप,
तरीही न डगमगता,
देशरक्षणासाठी येतो हुरूप.
देशासाठी अनेकांनी,
अर्पण केले प्राण,
जवानांच्या कर्तृत्वाला,
कोटी कोटी प्रणाम.
धन्य ते भारतीय जवान,
धन्य त्यांची कर्तव्याची जाण,
उंचावतात तेच भारतीयांचा मान,
सैनिकांच्या कर्तव्याला त्रिवार सलाम.
