कृष्ण रंगात राधा रंगली
कृष्ण रंगात राधा रंगली
कृष्ण रंगात राधा रंगली..
मधुर वाणी समस्थ संसारात पसरली..
कृष्ण रंगात काय लिहू....
राहशील तू अमर सर्वत्र तुझी प्रत्येक गोष्ट लिहू..
प्रेमाच्या सागराबद्दल लिहू,चेतनाच चिंतनासाठी लिहू...
प्रीतीचा प्रीत हि तूच,आत्मातला मंथनही तूच..
ज्ञानिया चा ज्ञान आहेस तू.. गाईचा आहार आहेस तू..
जेल मध्ये जन्माला लिहू. कि गोकुळातील पालनहार लिहू..
गोपिकांचं प्रिय आहेस तू,राधाचं प्रेम आहेस तू..
देवकीचा नंदन आहेस तू,यशोदेचा लाल आहेस तू..
वासुदेव चा तनय हि तूच.. नंद चा गोपाळ हि तूच..
रुख्मिणीचा श्री आहेस तू,सत्यभामाच श्रीतम आहेस तू..
स्थिर चित्त आहेस तू यताति सर्वात्मा आहेस तू..
आत्मतत्व चिंतन आहेस तू प्राणेश्वर परमात्मा आहेस तू..
कृष्णाच्या पराकाष्टच राधा आहे स्वरूप..
स्वतःतच कृष्ण असण्याचं राधा आहे रूप...
कृष्ण रंगात काय लिहू..
कंसाच्या विष बद्दल लिहू..
तुज्या प्रिय भक्तांच्या अमृताबद्दल लिहू..
कृष्ण रंगात सप्तरंग विरहू..
बासरीची मधुर वाणी समस्त संसारात पसरू..