कलंक
कलंक
1 min
419
दोष जगण्याचे कोणाच्या रे माथी
जो तो इथे षंढ नावासाठी
कैसे रंगताती बोलाचेच रंग
स्वार्थ जपताती ध्येयासाठी
नको बोल लावू अर्थाच्या धुळीला
स्वतःमाजी कर्म नसे तेव्हा
कशा मोजशी तू पापाचे पेठा रे
अंगामाजी पुण्य नसे तेव्हा
नाही सोसले तू दगडाचे घाव
उगा देवपण हवे कशासाठी
नाही लढला जो अंधाराशी काल
हाव आज त्याची उषेसाठी
चिरुनीया मर्म उरे जिथे धर्म
ऐसा नुरे वर्म कशापायी
कळूनही सारे डोळे ज्याचे बंद
स्वतः म्हणवितो साधू संत
लावुनिया बळ कापशील पंख
ऐसे डंख येती परतुनी
म्हणशील यासी समाजाचे भान
तोचि रे कलंक तुझा तुला
