ओथंबले धुके
ओथंबले धुके
1 min
425
ओथंबल्या धुक्याशी कधी
मुकी साद द्यावी घनांनी अशी
सापडावे पुन्हा आसवांनी मनाला
मिठी वेदनांची सोडवावी कशी
जिथे शब्द नाही फुलांच्या व्यथांना
अशी अंतरे दूर क्षितिजे जशी
उगा भूल पडते पतंगास का
वात जळूनी तरी सांग जळते कशी
