'खरचं आम्हाला माफ कर'
'खरचं आम्हाला माफ कर'


प्रिय दामिनी...
“खरच आम्हाला माफ़ कर
आम्ही तुला वाचवू शकलो नाही
एकीची ताकद वेळेवर .
दाखवू शकलो नाही..
तू भोगलेल्या त्या यातनांचे वर्णन
शब्दात मी करु शकत नाही आणि...
करणार ही नाही..कारण..
कुणिच ठामपणे सांगु शकत नाही
की पुन्हा असं घडणार नाही
आणि पुन्हा एक 'दामिनी'
अशी तिळ्-तिळ मरणार नाही
फ़क़्त एकदाच बघ ना गं…
तुझ्यासाठी लाखो लोकांचा समुह
आज रस्त्यावर जुडलाय
तुझ्यासाठी ओरडुन ओरडुन
त्यांचा घसा ही कोरडा पडलाय
बघ ना गं …
तुझ्या आऊष्यातील अंधार मिटवण्यासाठी
त्यांनी मेणबत्त्यांचा प्रकाश पाडलाय
पण..पण...
वेळ निघुन गेल्यावर
जमून काय उपयोग
तूच निघुन गेल्यावर
ओरडून काय उपयोग
आणि..
असंख्य यातनांचा
तो शैतानी अनुभव घेउन
शांत मिटलेल्या
तुझ्या त्या निरागस डोळ्यांना
लाखो मेणबत्त्याच्या
त्या प्रकाशाचा काय उपयोग
पण....
बर झाल तू निघुन गेलीस
असच सारखं वाटतं..कारण
आपल्यांच्या सहवासातही
आजकाल परकं
वाटतं..
अजुनही काळजी वाटते तुझी
की तू त्या देवाजवळही
सुरक्षीत आहेस की नाही
तो खरच असेल् तर!!
का त्याने वाचवलं नाही तुला??
का अस तडपवलं त्याने तुला??
का त्या नराधमांना दिलं इतकं बळ??
कुठल्या जन्माच दिल तुला इतकं वाइट फ़ळ??
देव ...??
अगं त्या देवांचाही काही नेम नाही
काहीतरी सुचवतील तुला
आणि नर्तकी बनवुन इंद्रदरबारी
नाचवतील तुला...
पण....
एक सुरक्षीत जागा आहे दामीनी...
जिथे स्त्रीच्या केसालाही धक्का लागत नाही
जिथे स्त्रीच्या चारित्र्यावर कलंकाचा
कसलाही शिक्का लागत नाही
जा..जा माझ्या “शिवाजी राजाच्या” चरणी जा
तुझ्या जीवनाचं सार्थक वाटेल तुला..
आणि माझ्या राजाच्या सावलीपुढे
सगळंच निरर्थक वाटेल तुला
घे तलवार भवानीची हाती
आणि तिथुनच खडसावुन विचार
त्या ‘देवाला…’
काय तुझी चुक होती
काय होता तुझा गुन्हा..??
खरच दामिनी या दुष्ट माणसांमध्ये
जन्म् घेउ नको पुन्हा...”
खरच आम्हाला माफ़ कर....माफ़ कर...