कधी वाटते कुणी असावे
कधी वाटते कुणी असावे
1 min
29.4K
कधी वाटते कुणी असावे
आपल्यासाठी हसणारं, आपल्यासाठी रडणारं…
कधी वाटते कुणी असावे
आपला हात हातात धरणारं आणि
आपल्या स्पर्शाने मग एक अजब शहारं आणणारं…
कधी वाटते कुणी असावे
ज्याच्या एका नजरेनं कळावं
त्याच्या नझरे पलीकडे काहीच नसावं …
कधी वाटते कुणी असाव
आपले अश्रू हळूच पुसून टाकणारं
आपल्या चेहऱ्यावर एक अलगद हसू सोडून जाणारं…
कधी वाटते कुणी असावे
त्यानं फक्त आपल्या साठी जगावं
आणि आपण फक्त त्याच्यासाठी आयुष्यभर थांबावं …
