कैफ...
कैफ...
1 min
304
गात्रात आपुल्या यावी लाल-केशरी भरती
अलवार या कळीचे फुल व्हावे वेलीवरती ...
हा कैफ वेदनेचा संपू नये कधी ही
हळुवार रेशमी बंध सुटावे कैफावरती ...
या कातील कातर वेळी दरवळते रातराणी
कैफात चढविते गंध थरथरत्या ओठांवरती ...
आरक्त रक्तिमा गाली श्वासांची रेशीम गाणी
हलकेच पापण्यांची लय मिटते चाफ्यावरती...
