STORYMIRROR

Parag Pathrudkar

Others

3  

Parag Pathrudkar

Others

अबोली निखारे

अबोली निखारे

1 min
406

मनाच्या तळाशी व्यथा गाडताना

नको वाटते तूज हे सांगताना 


जळाल्या मनाच्या इच्छा या अताशा 

अबोली निखारे तिथे पाहताना 


कसे सांग ना ? का मला आकळेना 

फुले वेचली गोवऱ्या वेचताना 


जसे भोग केले तसे भोग आता 

नको दोष देवू तिला बोलताना 


तिची चूक नाही नव्हतीच केव्हा 

न संकोच आता तिला सांगताना 


Rate this content
Log in