काय पुण्य काय पाप
काय पुण्य काय पाप
1 min
190
ओवी छंद काव्य
काय पुण्य काय पाप
काय पुण्य काय पाप
ओलांडते पत्नी माप
सुखावतो..होता बाप
पुरूष माझ्यातला..
पाऊले ती चिमुकली
धावे घेण्या भातुकली
होतो जणू मी सावली
माझ्या सानुल्यासाठी
भासे मज बाळ गोड
तळहातातला फोड
लागते मज ही खोड
हवे ते पुरवितो..
मारून पोटाची भूक
शिकवितो त्यास खूप
आणतो नवा हुरूप
रोज तरूणापरी..
शिकून मुले ती सारी
अशी घेतात भरारी
येती ना पुन्हा माघारी
भेटण्या बापालाही..
वाटेस लावून डोळा
झुरतो रे तोळा तोळा
आशेवर बाप भोळा
जगतो दिनरात..
विरह किती सोसतो
भेटीसाठी तरसतो
दुःखी असून हसतो
चारचौघात बाप..
काय पुण्य काय पाप
म्हातारपणी तो बाप
भोगतो कित्येक शाप
वृद्धाश्रमाच्या दारी..
