सय माहेराची (अष्टाक्षरी ओवी)
सय माहेराची (अष्टाक्षरी ओवी)
1 min
403
झाले जरी किती वय
मन स्मृतीचे वलय
येता माहेराची सय
उगा हुरहुरते
आई बहिणीची माया
आजी आजोबाची छाया
बाप जणू विठूराया
बंधू रे पाठीराखा
मुक्या जिञाबांचा पोळा
श्रावणातला हिंदोळा
सणांचिये भाव भोळा
स्मरतो अजूनही
सेवा करी किती जणी
पहिल्या बाळंतपणी
न्हावू घाली मावळणी
माझ्या गं तान्हुल्यास
पाणी आडाचे शेंदते
चुलीवरती रांधते
माय ममता बांधते
सासरी मी जाताना
लागे आठवांचा छंद
करी मनास बेबंद
मुरलेला गुलकंद
मज हा भासतसे
