STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

काय करावं ?

काय करावं ?

1 min
258

पडावं, धडपडावं मग उठावं तरी यश न मिळावं

हीच साऱ्यांची व्यथा असं मनाने मानावं

तेव्हा रडावं नाही तर काय करावं ?


साऱ्या दुनियेनं झिडकारावं मग मी आपल्यांकडे जावं

पण त्यांनीही म्हणावं की स्वतः स्वतःचं सावरावं

तेव्हा रडावं नाही तर काय करावं ?


तुफानात पाय रोवण्याची धडपड जीवघेणी

मी तरी खंबीर असावं पण सोबतीला आपलं कुणीच नसावं

तेव्हा रडावं नाही तर काय करावं ?


आता बस्स झाले रडगाणे असं मना समजवावं

साऱ्या संकटांशी जिद्दीने लढावं अन शिखर गाठावं

यालाच आयुष्य समजून फक्त जगतंच जावं !!!


Rate this content
Log in