ज्योत
ज्योत




आई थांब गं जरा
माझ ऐक गं जरा
आई गं आई
का करतेस घाई
तुला नाही वाटत घरात असावी
दादा म्हणणारी ताई
आई - बाबा तुम्हाला वंशाचा
दिवा पाहिजे आहे
पण तुम्हाला हे समजत का नाही???दिवा प्रज्वलित करण्यासाठी
"ज्योत" आवश्यकच आहे
म्हणून शेवटी एवढेच सांगते
आई जन्म घेईन
एकदा तुझ्या पोटी
अन् सृष्टी पाहून
सुखाने भरेल तुझी ओटी!!!