जयभीम
जयभीम
1 min
333
जयभीम जयभीम घ्यावा तुम्ही
मनापासूनी घ्या, मनापासूनी
जयभीम घेण्याला लाजता कशाला
भीती ही कुणाची आज नाही तुम्हाला!!धृ!!
दीन दुबळ्याचे होते भीम कैवारी
कर्तव्याची जाण असू द्या अंतरी
माणुसकीची वाट दाविली भीमाने
जगावे जीवन आता तरी मानाने
हा स्वाभिमान तुम्हा मिळवूनी दिला !!२!!
भीम बाबा ते सांगून गेले तुम्हा खरी
ताठ मानेने जीवन जगारे सिंहापरी
इज्जत आपली गमवू नका,स्वार्थासाठी
कुत्र्यावणी जाऊ नका,कुणापाठी
विसरू नका रे,भीम संदेशाला !!२!!
कार्य असे हे केले भीमाने मोलाचे
लिहिले संविधान भारत देशाचे
भारत भूमीवरती आहे त्याचे ऋण
करुनी दिली हक्काची आपल्या जाण
नरेश त्या हक्काने भाग्यवंत झाला !!३!!
