भीमशक्ती
भीमशक्ती
1 min
315
भीमाच्या लेकरांनो,आता तरी जागे व्हारे
कुत्र्यापरी का जगता,भीमशक्ती दाखवारे!!धृ!!
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व दिले मुलतत्व
कळेना भारतीय,नागरिकास महत्व
अंतकरणी भीम तत्वाला आता रुजवारे !!१!!
अन्याय अत्याचारी, जुलमी ती राजवट
केला भिमाने, तिचा क्षणात नायनाट
भिमाचे वीर रक्त अंगात साठवारे !!२!!
लागूनी पाठी आहे जातीयवादी भूत
बाबाच्या प्रतिमेचा,अपमान आहे होत
जगावे सिंहापरी तो संदेश आठवारे !!३!!
लिहिली भीमाने घटना जागुनी दिन-रात
लावील कुणी का बोट,छाटून टाकु हात
घटनेची रक्षा करण्या सारे समोर व्हारे !!४!!
निद्रेत नका राहु काटेरी आहे वाट वैऱ्याना दाखवारे तुमची ती एकजूट
नरेश भाऊ भावाचे वैर मिटवारे !!५!!
