जोडी तुझी माझी
जोडी तुझी माझी
1 min
1.2K
जोडी तुझी माझी सखे
कशी राजाराणी वाणी
मग सुखी संसाराची
गाऊ गोड गोड गाणी ।।
जोडी तुझी माझी सखे
जशी राधा आणि कृष्ण
राहू आपण आनंदी
करु उसनं पासनं ।।
जोडी तुझी माझी सखे
जशी राम आणि सिता
जाऊ दोघे वनवासा
घडो रामायण कथा ।।
जोडी तुझी माझी सखे
जणू शंकर पार्वती
जाऊ मिळून कैलासा
करु देवाची आरती ।।
जोडी तुझी माझी सखे
असो ती साता जन्माची
जन्मो जन्मी मिळो तूच
पुजा कर तू वडाची ।।
