STORYMIRROR

Pratik Dhawalikar

Others

4  

Pratik Dhawalikar

Others

जन्म

जन्म

1 min
326

लाट हिंडोळत येई,

येई गाज संगे तिच्या,

मज सांगे मीच आता,

गुजगोष्टी मनीच्या,

लाट समीप येतसे,

मी अबोल मात्र होई,

स्पर्शूनी क्षणात मला,

ती विरून लगेच जाई,

मज कळले न कधीही,

विरून पुन्हा नव्याने,

ती जन्म घेई,

की मी मोकळं मनाने..



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Pratik Dhawalikar