जन्म
जन्म
1 min
27.4K
रीतं झालय आकाश,तरीही तो निळा डोह भरला आहे,
शून्यनेही निर्मितीचा गर्भ धारण केला आहे,
वाटलं होतं संपलं सगळं ,आता काहीच उरलं नाही,
पण पोकळीतही, अद्वैत भरून उरल्याच जाणवत आहे.
पुन्हा एकदा आकाशावर बिंब आकार घेतंय,
पंच महाभूतांचा देह पुन्हा एकदा साकार होतोय,
देह भेदून ओंकार त्यात प्राण फुंकू पाहतोय
निराकाराच्या पडद्यावर आकार जन्म घेतोय.
मृत्यूू लाही, संचिताच्या कर्माचं कोंदण आहे,
श्वासात समावणारा आता ,श्वासातूनच प्रकट होतो आहे,
सगळं संपलं वाटताना,खडकालाच अंकुर फुटतो आहे,
आणि नेहमी प्रमाणे मृत्यू मात्र, जन्मालाच प्रसवतो आहे
