जल्लोषात आभार
जल्लोषात आभार
दिवस आमचा सुरु झाला त्याच्या आगमनाआधी
खरा उत्साह वाढत गेला त्याच्या आगमनानं आमच्यात
आज त्याच्या हालचालीवर होती आमची नजर
तोही आमच्यात कधी कसा सामील झाला न कळे आम्हा
सोबतच आम्ही आजचा दिवस खूप आनंदात घालवला
त्याची जायची वेळ झाली तसा तो आमच्यापासून दूर दूर गेला
अंतर आमच्यातले वाढत गेले हूरहूर मना वाटायला लागले
जल्लोषाने मग आम्ही हात उंचाऊनी त्याला परत भेटण्याचे आश्वासन देऊन 'बाय बाय' केले
जल्लोष आमचा पाहुन क्षणभर तोही गलबलला
त्यानेही आपले सहस्त्र सहस्त्र बाहु चहु बाजुला पसरवले
कवेत आम्हाला घेत अनेक अनेक आशीर्वाद दिले
नकळत आम्ही नतमस्तक झालो त्याच्या
जीवनातली त्याची महती अजून जाणण्या आतुर आता