जीवनसंघर्ष
जीवनसंघर्ष
नश्वर हे मन नश्वर शरीर
काट्या फुलातुनी तुडवावा डोंगर
नियतीचा खेळ सोसवेना भार
पैलतीरा जाण्या नामस्मरणाचा जोर
संकटसमयी ओघळले अश्रुंचे बांध
आठवती साऱ्या नात्यांचे अनुबंध
पैसा आणि माणुसकी शत्रुत्व बंध
दूर होताना दिसती नातेसंबंध
कधी करतो पोटासाठी वणवण
संसारी न चुके कदा पैशाची चणचण
करी भविष्यासाठी दाण्याची साठवण
म्हणुनी जपावे माणसातील माणूसपण
कधी वारू उधळला लगाम ओढून
नियती पाहत आहे हाती मांजा धरून
भाळी लिहिले न चुके राहिले जरी लपून
देव पाठीशी राही कुणाही रूपातून
इंद्रधनुचे रंग कधी गडद कधी फिके
जोडण्या नाती मन घाली घट्ट टाके
उगवला सूर्य सदा निशाही न टिके
जगावे रंगीत आयुष्य उडणाऱ्या पक्षासारखे
झुळूक आली की खेळवतो झुला
वाऱ्या वादळात आवर मनाला सोडव अलगद
जीवनसंघर्षाच्या विळख्यातून स्वतःला
फुलव आयुष्याचा सप्तसुरांनी हा मळा
फुलव आयुष्याचा सप्तसुरांनी हा मळा
