STORYMIRROR

Chetan Deshmukh

Others

3  

Chetan Deshmukh

Others

जीवन.....!

जीवन.....!

1 min
27K


जीवन सुंदर आहे

पण थोडं लहान आहे,

थोडं गुरफटलेल

पण छान आहे.......


इथ प्रत्येक दिवस

नाविन्यपूर्ण आहे,

उत्साहानं जग वेड्या

हाच तो क्षण आहे........


आलेली प्रत्येक वेळ

सावली अन ऊन आहे,

सामोर जाताना कळेल

साथीला कोण आहे........


आयुष्य सुख आणि

दुःखातिल अंतर आहे,

उमेदिन उत्साहान जगल

तर खुप सुंदर आहे........


जीवन एक नाविन्यानं

भरलेल रान आहे,

ईश्वरान झोळीत टाकलेल

फेडि पलिकड़च दान आहे......


जीवन म्हणजे अतूट

मैत्रीच पान आहे,

जीवापाड जपल

तर महान आहे........


नकार पचवलेल्या

प्रियकराच मन आहे,

थोड़ लहान पण सुंदर

हेच खर जीवन आहे........


Rate this content
Log in

More marathi poem from Chetan Deshmukh