जीवन जगणे
जीवन जगणे
1 min
27.3K
जीवन जगणे
म्हणोत कोणी आम्हास काही
जीवन सुंदर जगतो आम्ही
नच इतरांसम कण्हत कण्हत
जीवन रडत ढकलतो आम्ही
नसेल काही, मात्र समाधानी
आनंद सगळ्यात शोधतो आम्ही
आला क्षण, आपलाच जाणूनी
क्षण हे सुखात जगतो आम्ही
संकटे जरी आली अचानक
निर्णय स्वावलंबी घेतो आम्ही
नियतीचे निर्णय नाही बदलत
नियतीलाच तर बदलतो आम्ही
संध्याकाळ आम्हा नाहीच रूचत
सुर्योदया प्रमाणे उगवतो आम्ही
दू:ख, वेदना हसत झेलूनी
आनंद जीवनी आणतो आम्ही
एक एक माणूस जोडत जोडत
माणुसकी पण जपतो आम्ही
सर्व धर्म सम भाव मानूनी
राष्ट्र ऐक्य ही घडवतो आम्ही
