झिम झिम करित पाऊस आला...
झिम झिम करित पाऊस आला...


झिम झिम करित पाऊस आला ।
वाऱ्याच्या झोक्याने पसरून गेला।।१।।
झिम झिम करित पाऊस आला....
पोरांचा मनात आनंद आला।
चोहीकडे जलधारचा विस्तार झाला।।२।।
झिम झिम करित पाऊस आला....
प्राण्यांचा मनात हर्ष उमटला ।
वनात जल वर्षांव झाला ।।३।।
झिम झिम करित पाऊस आला....
पुष्प-फुलांवर अंकुर आला।
सर्वकडे मातीचा सुगंध पसरला ।।४।।
झिम झिम करित पाऊस आला....
शेतात मोर नाचायला आला।
पक्ष्यांचा घोंघाट विस्तारू लागला ।।५।।
झिम झिम करित पाऊस आला....
मेघराजाचा आगमनाचा ढोल वाजला।
विजांचा कडकडाट जोरात झाला।।६।।
झिम झिम करित पाऊस आला....
शेतकरी मित्राला उल्लास आला।
शेतात पेरणीचा श्रीगणेश झाला।।७।।
झिम झिम करित पाऊस आला....
पाणीने नदी-तलाव भरून आला।
जगाने "पाऊसाचा सण" उजवला।।८।।
झिम झिम करित पाऊस आला....