जाते मी
जाते मी


तुझे दोन शब्द ऐकण्यासाठी,
फक्त तुझी एक झलक पाहण्यासाठी,
रोज लवकर उठून तयार होतो मी
तुझ्या तोंडून 'जाते मी ' ऐकण्यासाठी...
मित्रांना सोडुनी गर्दी असलेल्या गाडीमधुनी,
येतो मी अर्धा बाहेर लटकुनी,
फक्त तुझ्या तोंडून 'जाते मी ' ऐकण्यासाठी...
पाहतो जेव्हा तुला,भान ही राहत नाही मला,
फक्त पाहतच राहावे , तुला असे वाटे मला,
पण पाहण्याअधिच जातेस तू,
'जाते मी ' सांगुनी मला...
राग येतो मला,पण हल्ली राग ही येत नाही मला.
तुझे आणी काय नाते आहे ठाऊकच नाही मला,
तरी सुद्धा थांबतो मी,
तुझ्या तोंडून 'जाते मी ' ऐकण्याकरिता...
डावलुनी मित्रांना पाहुनी सर्वाना,
करतो त्यांच्याकडे दुर्लक्ष मी,
तू माझ्या सोबत असताना...
पण तुझे लक्ष माझ्याकडे वेधून घेण्याअधिच,
तू जातेस 'जाते मी ' बोलुनी मला...
पाहत राहीन जीवनभर तुझी वाट,
सहन ही करेन तुझ्यासाठी काटेरी वाट,
अंतिम श्वासापरियेत गोड वाटतील
तुझ्या तोंडून ते दोन शब्द,
मरणाच्या दारावरही तू जाशील का,
बोलुनी मला 'जाते मी ' हा पडतो मला नेहमी प्रश्न....