होय मी औरंगजेब बोलतोय
होय मी औरंगजेब बोलतोय
नैतिकतेच्या दृष्टीकोनातून मी अत्यंत चारित्र्यसंपन्न
कुराणाची आयत लिहून मी स्वखर्च भागवायचो
राज्यविस्तारासाठी मी कित्येक लढाया लढलो
माझ्या मृत्यूपर्यंत माझ्या साम्राज्याचा मीच शासक होतो
माझे साम्राज्य सर्वशक्तिशाली मानले जात होते
कारण माझे राज्य अति विशाल होते
लढाईत एका हत्तीच्या पायदळी आलो
आणि तरीही मी लढत राहिलो
शत्रूंशी अन मृत्युशी झुंज देत राहिलो
मी माझ्या साम्राज्याचा एक नीडर योद्धा होतो
माझा असा विश्वास होता की जर तुम्ही न लढताच शत्रूसमोर हार मानत असाल
तर तुमच्यापेक्षा वाईट अन् मुर्ख कोणीच नाही
इतिहासकारांना यात काडीमात्रही शंका नाही की मी एक महान सम्राट होतो,
आणि माझ्यावेळी माझ्या साम्राज्याच्या समृद्धीचे सुवर्णयुग होते
मी लाहोरची बादशाही मशीद बनवली
मी बीबीका का मकबरा बनवला
मी मोती मशीद बनवली
मी इतिहासातला एक सर्वांत सशक्त आणि शक्तिशाली राजा मानला जातो
मी अखंड भारत बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता
आणि हो मीच माझ्या स्वतःच्या वडिलांना नजरकैदेत ठेवले होते
आणि त्यांच्या मृत्यूचे कारणदेखील मीच होतो ज्याचे मला लेशमात्रही दुःख नाही
कारण मी पुरू नाही मी यदु होतो
होय मी औरंगजेब बोलतोय...
