"हिंदू म्हणून मरणार नाही"
"हिंदू म्हणून मरणार नाही"
माझ्या वाट्याला आलेली जनतेची कर्तव्यं मी कोणाकडेही सारणार नाही.....
मी हिंदू म्हणून जन्माला जरी आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही .....||धृ||
करतात प्राण्यांची हत्या,माणसाला वाळीत टाकतात...
नंतर हेच पांढरपेशी लोक दगडापुढं वाकतात......
अशा दगडासाठी मी निष्पाप प्राण्यांची हत्या करणार नाही ||१|| मी हिंदू म्हणून..........
दगडात आहे देव म्हणून दगड घेऊन नाचतात....
दाभोळकरांचे विचार मात्र ह्या हरामखोरांना टोचतात...
अशा नरसाळ्यांना मी आपल्यात ग्राह्य धरणार नाही ||२|| मी हिंदू म्हणून ...........
नाही घेतलं दर्शन त्याचं तर कोणीही मरत नाही....
अंगाला झालेली जखम अंगारे, धुपाऱ्याने भरत नाही...
पंचपक्वान्नं कष्टाविना देव खाटल्यावर आणुन चारणार नाही || ३ || मी हिंदू म्हणून.........
जातीवादाला मी पेनाच्या टोकाने गारद केला......
एवढा विरोध असताना स्वतंत्र 'भारत' केला.....
मला माझे हात आहेत तुमच्या ओंजळीणे पाणी मी प्राषन करणार नाही ||४|| मी हिंदू म्हणून.......
एकट्याच्या हिम्मतीवर मी हा राष्ट्रग्रंथ लिहीला.....
सांगा किती नागरीकांनी तो जात बाजूला ठेऊन पाहीला...
'भारताच्या' माझ्या तुम्ही पाकिस्तान केला.....
एकत्र होता त्याला जातीधर्माकडं नेला.....
'सार्वभौम भारताचा' मी हिंदुस्तान करणार नाही ||५||
मी हिंदू म्हणून जन्माला जरी आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही !!!
