हेच का ते प्रेम
हेच का ते प्रेम
तुझं रोज डोळ्यातून वाहणं
चोरून लपून मी पाहणं
अन मी माझं ना राहणं
हेच का ते प्रेम आहे.....
एकमेकांची गुपीत कळणं
जीवघेणी वळणं,मग त्यापासून पळणं
सारं सेम टू सेम आहे
हेच का ते प्रेम आहे.....
तिचं त्रासानं तळमळणं
ते पाहून मज मनाचं रडणं
सुखशांतीवर नेम आहे
हेच का ते प्रेम आहे.....
भांडतो तुझ्याशी
तुझ्यावाचून करमेना
तूच जगण्याची फ्रेम आहे
हेच का ते प्रेम आहे.....
रात्र रात्र बोलणं
शब्दांचही कमी पडणं
नजरेने एकमेकांशी लढणं
तिच्यावर जीव जडणं
जी परमात्म्याची देन आहे
हेच का ते प्रेम आहे.....
जगण्याची आशा देणं
पण जगू देणं ना मरू देणं
आयुष्याचा मोठा गेम आहे
हेच का ते प्रेम आहे.....
