हे महादेवा
हे महादेवा
हे महादेवा जसं तुझं पार्वतीचं नातं आहे
तसं माझ्या आई-बाबांचं नातं असावं
त्यांनी पण एकमेकांचं अर्धांग बनावं
हे नीलकंठा जसं तू विष प्राशन केलं
तसं गैरसमजाचं विष यांनी पिऊन संपून टाकावं
आणि सुख समृद्धीने आमच्या घरी नांदावं
हे गंगाधरा जशी गंगा तुझ्या जटेत वसते
तसं विश्वासाने आई-बाबांच्या मनी वसावं
अन त्यात प्रेमाने खळखळून वाहावं
हे नागनाथा जशी नागमाला तुझ्यापाशी
तसं प्रेममालेने आमच्या जीवनी फुलावं
आणि बाप्पासारखं एक गोंडस फूल उमलावं
हे भालचंद्रा जसा चंद्र तुझ्या डोक्यावर
त्या चंद्रकोरीने आमच्या आयुष्यात पण असावं
थोडं दुखःही असावं ज्यानं सुखाला अनुभवावं
हे डमरूधरा तुझं डमरू वाजावं अन दुखः शमावं
माझ्या खुशीत त्यांची खुशी म्हणून मी कायम खुश असावं...
