हातांच्या कविता
हातांच्या कविता
1 min
26K
(१)
माझ्या आयुष्याचं रोपटं
ठेवलंय तुझ्या तळहातावर
तुझा तळहात...
जपण्याची जबाबदारी माझ्यावर.
(२)
हात हातात घेण्यासाठी असतात
हात हातात देण्यासाठी असतात
हातांनी हातांना सावरायचं असतं
हातांनी हातांना आवरायचं असतं
हातांना हे कुणीतरी कळवायला हवं
कारण...
हात हातात घेऊनच
हातांना जगायचं आहे
सृष्टीच्या अंतिम श्वासापर्यंत.
(३)
हातच करीत असतात प्रार्थना
जगाच्या कल्याणासाठी
आणि
हातच करीत असतात उध्वस्त
मानवी जीवन काही क्षणात,
म्हणूनच...
आता तरी हातांनी हातांशी
हातमिळवणी करायला हवी!!
